माजी विद्यार्थी मेळावा 2024-25
मिलिंद विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला
दिनांक 21/12/2024 रोजी मिलिंद विज्ञान महावि्यालयाच्या अल्यमनी असोसिएशन -ALUMNI MEET -2024-25 उत्साहात पार पडला. महाविद्यालय स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत च्या बऱ्याच माझी विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला, या वेळी इमिनेंट माझी विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शनपर माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासाठी, तसेच विद्यार्थांनच्या सर्वांगीण विकासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी आम्ही प्रयत्न करण्यास इच्छुक असलेल्यानी तयारी दर्शवली. यावेळी सेवानिवृत्त प्रोफेसर, एक गजलकार, डॉ. दोस्त खान सर (1967-68) बॅच चे विद्यार्थी , सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर मत्स्यविभाग महारष्ट्र राज्य मा. रमेश सपकाळ सर (1984-84) बॅच चे विद्यार्थी, सेवानिवृत्त डॉ. मेश्राम सर तसेच प्राचार्या डॉ. टी.न कदम सर PES polytechnic कॉलेज , यांनी मार्गदर्शन केले उपस्थित असलेले माजी विद्यार्थि मोठमोठ्या पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांतीलाल राठोड सर यांनी अध्यक्ष स्थान भूषविले, अलुमनी असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. धर्मपाल वाघ यांनी प्रस्तावना केली, डॉ. आकेश जाधव यांनी सूत्रसंचलन केल, असोसिएशन चे सदस्या प्रवीण राण्येवले यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले, कार्यक्रम यशस्वी रीते पारपाडण्यासाठी, असोसिएशन चे सदस्या ,विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले…